सामाजिक कृतज्ञता पुरस्कार – “Gratitude Of Society” awards

सामाजिक कृतज्ञता पुरस्कार Samajik Krutadnyata Puraskar (Gratitude Of Society) awards 2013 were given away at the SM Joshi Hall, Pune on 19th Jan 2013. Vidya Bal was honoured with the lifetime award while SM Joshi activist award winner was Suresh Sawant. The Dr. Ram Apte activist award winner was Milind Chavan. Other speakers at the event were Rohini Hattangadi, Pushpa Bhave & Baba Adhav.

The idea behind the trust & the awards is to express society’s gratitude to those who selflessly toil for various social causes and to support various activists in their times of need.

2013 was the 25th year of the awards. The award fund of over a crore was collected largely through the efforts of the veteran actors like Shreeram Lagu, Nilu Phule & others.

Vidya Bal (Lifetime Achievement Award)

Suresh Sawant (S M Joshi Award Winner)

Milind Chavan (Ram Apte Award Winner)

Pushpa Bhave

Narendra Dabholkar

Baba Adhav

सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे देण्यात येणारा ‘सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव पुरस्कार’ स्त्री-पुरुष समानतेसाठी आयुष्य खर्ची घालणा-या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ यांना जाहीर झाला आहे. नवी पेठ येथे १९ जानेवारीला होणा-या सामाजिक कृतज्ञता निधीच्या रौप्यमहोत्सव सोहळ्यात ज्येष्ठ लेखिका पुष्पा भावे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सामाजिक कृतज्ञता निधीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम लागू हे उपस्थित राहणार आहेत.

रेशिनगच्या प्रश्नावर महाराष्ट्रभर संघर्ष उभा करणारे ‘रेशिनग कृती समिती’चे सुरेश सावंत यांना ‘एस. एम. जोशी कार्यकर्ता पुरस्कार’, पुणे येथील लोक उत्सव समितीचे प्रमुख व ‘मासूम’चे कार्यकत्रे मिलिंद चव्हाण यांना ‘डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार’ देण्यात येणार आहे. src: prahaar

सामाजिक कृतज्ञता निधीची २५ वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली. जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये मग ते दलित असोत, आदिवासी असोत, वेठ-बिगार असोत, वैशांची मुले असोत, देवदासी असोत, अंधश्रद्धा निर्मुलन असो, या क्षेत्रामध्ये आयुष्य झोकून देवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्याप्रती समाजाची कृतज्ञता म्हणून हा निधी उभा करण्यात आला. छोट्या-छोट्या रकमेतून १ कोटी रुपये उभे केले. डॉ श्रीराम लागू त्याचे अध्यक्ष होते, डॉ बाबा आढाव त्याचे कार्याध्यक्ष होते आणि मी त्याचा कार्यवाह आहे ताहीर पूनावाला कोषाध्यक्ष होते आणि आणखी दहा-पंधरा विश्वस्थ आहेत, या १ कोटी रुपयांच्या व्याजातून दरवर्षी आम्ही साधारणपणे ४० ते ५० कार्यकर्त्यांना वर्षाला १५ हजार रुपये देतो आणि या गोष्टीला २५ वर्ष पूर्ण होताहेत म्हणून १९ तारखेला दुपारी ३ ते रात्री ७.३० पर्यंत एस एम जोशी फौंडेशन, पुणे इथे याचा कार्यक्रम आहे.

दुपारी ३ ते ५ या वेळी कार्यकर्त्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम होईल. ५- ६ यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार आणि कार्यकर्ता आणि प्रबोधन पुरस्कार ज्यांना दिला जाणार आहे तो पुरस्कार प्रदान होईल आणि नंतर ६ ते ७.३० रोहिणी हट्टंगडी पुष्पाताई भावे बाबा आढाव यांची एकंदरीत रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निम्मित्ताने भाषणे होतील. src: DrDabholkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *